top of page
Ek Ghas (4).png

'एक घास समाजासाठी'
संकल्पने अंतर्गत...

सामाजिक उपक्रम 

एक घास फाउंडेशन 'एक घास समाजासाठी' उपक्रमाअंतर्गत एकूण ६ अनाथ आश्रम तसेच किनारा वृद्धाश्रम येथे दर महिन्याला किराणा, शैक्षणिक वस्तू, औषधे, जेवण, फळे, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये खालील आश्रम संस्थांचा समावेश आहे. 

अनिकेत मतिमंद अनाथाश्रम_edited.jpg

अनिकेत मतिमंद अनाथ आश्रम 

सुदृढ असलेल्या बुद्धिमान मुलांचे कौतुक कुणीही करेल पण मतिमंद बालके या कौतुकापासून वंचित राहतात. विशेषतः जर ते अनाथ असतील तर त्यांना मानसिक आधार देण्यासाठी आई - वडीलही नसतात. आम्ही जेव्हा पहिल्यांदा या आश्रमास भेट दिली तेव्हा फक्त हताश होऊन बघत राहण्यापलीकडे मार्ग सुचत नव्हता. त्यांचे आई-वडील तर होता येत नाही पण त्यांच्या मुखात घास तर भरवू शकतो. या विचाराने प्रेरित होऊन एक घास फाउंडेशन तर्फे २ ० २ १  पासून अनिकेत मतिमंद अनाथ आश्रम येथे दरमहा अन्नधान्य, औषधे, कपडे  आणि जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. 

WhatsApp Image 2024-09-04 at 08.49_edite

अजित फाउंडेशन सृजनालाय अनाथ आश्रम तळेगाव, पुणे

सृजणालय ही स्थलांतरित, सिग्रल वर भीक मागणारी, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची, लैंगिक शोषणाला बळी पडलेली, दुर्लक्षित जाती जमातीची एकल पालक मुले, अनाथ, निराधार, निरश्रीत, संघर्षग्रस्त उपेक्षित मुले ज्यांच्या शिक्षणाची, संस्काराची, आवश्यक व्यवहारज्ञानाची , पालनपोषणाची, आणि पालकत्वाची गरज पूर्ण व्हावी यासाठी चालवली जाणारी विनाअनुदानित संस्था. एक घास फाउंडेशन तर्फे या सेवाभावी संस्थेला अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. 

WhatsApp Image 2024-09-06 at 16.39_edite

निर्मल बालविकास संस्था, चाकण, पुणे

येथे अनाथ, निराधार, निरश्रीत, संघर्षग्रस्त उपेक्षित मुलांना  शिक्षण, पालनपोषण, संस्कार, व्यवहारज्ञान मिळावे यासाठी कार्यरत असलेली ही विनाअनुदानित संस्था. या संस्थेला एक घास फाऊंडेशन तर्फे अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो.

WhatsApp Image 2024-09-06 at 16.47_edite

पसायदान गुरुकुल अनाथ आश्रम, आळंदी, पुणे.

दुर्लक्षित जाती जमातीची एकल पालक मुले, अनाथ, निराधार, निरश्रीत, संघर्षग्रस्त उपेक्षित मुलांच्या शिक्षण, संस्कार, पोषण आणि  पालकत्वाचा ध्यास घेऊन चालवले जाणारे हे विनाअनुदानित पसायदान गुरुकुल अनाथ आश्रम आहे. या अनाथ आश्रमाला ' एक घास फाउंडेशन' तर्फे जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केला जातो.

WhatsApp Image 2024-09-04 at 08.48.59.jpeg

स्नेहछाया दिघी, आळंदी रोड, पुणे.

ही स्थलांतरित, सिग्रल वर भीक मागणारी, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची, लैंगिक शोषणाला बळी पडलेली, दुर्लक्षित जाती जमातीची एकल पालक मुले, अनाथ, निराधार, निरश्रीत, संघर्षग्रस्त उपेक्षित मुले ज्यांच्या शिक्षणाची, संस्काराची, आवश्यक व्यवहारज्ञानाची , पालनपोषणाची, आणि पालकत्वाची गरज पूर्ण व्हावी यासाठी चालवली जाणारी विनाअनुदानित संस्था. एक घास फाउंडेशन तर्फे या सेवाभावी संस्थेला अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. 

विविध सामाजिक उपक्रमांची क्षणचित्रे 

चळवळीत सहभागी व्हा!

आमच्या उपक्रमांबद्दल अपडेट राहण्यासाठी आपला ई - मेल आय डी नमूद करा. 

Thanks for submitting!

संपर्क 

धन्यवाद!

पत्ता 

एक घास फाउंडेशन 

गट क्र. १ १ १, जी . के. पॅलेसिओ सोसायटी, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पुणे. ४ १ २ १ ० ५ 

संपर्क क्र. 

९ ० २ ८ ४ ५ २ ६ २ ६ / ९ १ ६ ८ ५ ६ ५ ० ५ ३ 

ई-मेल 

© 2024 Ek Ghas Foundation

bottom of page