देशाचे उज्ज्वल भविष्य आणि संस्कारशील पिढी घडवण्यासाठी इ . २ री ते ८ वी पर्यंतच्या मुलांसाठी 'एक घास फाउंडेशन' तर्फे बालसंस्कार वर्ग आयोजित केले जातात. यामध्ये नैतिक मूल्ये, संस्कार तसेच बौद्धिक आणि मानसिक विकासासंदर्भातील महत्वाचे विषय हाताळले जातात जसे कि 'मोबाईल, टी. व्ही. क्राईम सिरीयल, इत्यादींचा बालमनावर होणारा परिणाम' त्याचे दुष्परिणाम त्यांना समजावीं सांगितले जातात. आजतागायत १ ० ० ० पेक्षा जास्त मुलांना याद्वारे पथदर्शन करण्यात आले आहे.